आदर्श युवा मंच तर्फे गणेशपुर येथे तान्हा पोळा सण साजरा
आदर्श युवा मंच तर्फे गणेशपुर येथे तान्हा पोळा सण साजरा
जनसेवक पवन मस्के यांनी केले मार्गदर्शन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, भंडारा : आदर्श नगर गणेशपुर भंडारा येथे मोठ्या उत्साहाने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गणेशपुरीतील ज्येष्ठ नागरिक श्री मोहतुरे , श्री.बोंद्रे श्री. सारवे, श्री युवराज हरडे,श्री सार्वे श्री मोहन वजारी श्री बाला वंजारी श्री बोरकर यांच्या हस्ते नंदी यांचे पूजन करण्यात आले व ज्येष्ठ महिला सौ. तारा मस्के , सौ पुस्तकला मते श्री.सुनीता भुरे, यांच्या हस्ते विजेत्यांना पुरूस्कृत करण्यात आले.
त्यात सुंदर आकर्षित असे तान्हा पोळ्यासाठी नंदी आणि लहान बाळ देखील सजवण्यात आले होते त्यात त्यांचे आकर्षण व त्यांचा रंगरंगोटी पाहून त्यांना पर्यवेक्षक म्हणून शितल मस्के, दिव्या मते, सौ मीनाक्षी नागपूरकर,सौ निकिता मस्के ,सौ. वैशाली मते यांनी वेशभूषा व रंगरंगोटी करून पारितोषिक क्रमांक देण्यात आले.तीन बक्षीस देण्यात आलेले होते त्यात प्रथम दिविज देशपांडे,द्वितीय आरुष मस्के,तृतीय आरवी चकोले,असे पारितोषिक यांचे नाव होते.
तसेच अनेक आकर्षित लहान बाळ आहे त्यांना देखील बक्षीस वितरण करण्यात आला.याकरिता आदर्श युवा मंच गणेशपुर भंडारा तर्फे मोठ्या उत्साहाने पवन मस्के यांनी संबोधित करतांनी शेतकरी व शेतकरी बांधवांसोबत तान्हा पोळ्याचे महत्त्व कळविले या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता आदर्श युवा मंच टीम मधील संजू मते बल्लू लुटे आणि अनेक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत