चिमुरात शहीद स्मृतिदिन सोहळाचे आयोजन
चिमुरात शहीद स्मृतिदिन सोहळाचे आयोजन
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीसांची राहणार उपस्थिती
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,राजू शर्मा, चिमूर : भारतीय स्वातंत्र्य लढयात १६ ऑगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीचे अमुल्य योगदान आहे. चिमूर क्रांती लढ्याचे स्मरण करण्याचे दृष्टीने अमर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता १६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता शहीद स्मृतिदिन सोहळयाचे आयोजन केले असल्याची माहिती चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली.
या सोहळयाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रमुख पाहुणे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगन्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आमदार गिरीष महाजन, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,
देवराव होळी, कृष्णाजी गजभे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी आमदार मितेशजी भांगडिया, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, माजी आमदार संजय धोटे, सुधीर पारवे, भाजपा जिल्हाधक्ष देवराव भोन्गडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सकाळी ११ वाजता बिपीएड कॉलेज चिमूर येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार सप्तखंजेरी वादक संदीप पाल महाराज यांचे समाज प्रबोधन, दुपारी १२ वाजता अमर शहिदांना अभिवादन,
स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटुंब प्रमुखांचा सत्कार करण्यात येणार आहे.सोहळाला उपस्थित राहण्याचे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत