अहमदनगर पुणे महामार्गावर टॅंकर पलटी चालक गंभीर जखमी
अहमदनगर पुणे महामार्गावर टॅंकर पलटी चालक गंभीर जखमी
नारायणगव्हाणच्या युवकांनी वाचवले चालकाचे प्राण
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे, पारनेर : अहमदनगर पुणे महामार्गावरील महत्त्वाचा ब्लॅक स्पाॅट असलेल्या नारायणगव्हाण येथे टँकर लाईट पोलला धडकुन पलटी झाल्याने टॅंकर चालकाचे पाय गुंतलेले होते . गावातील युवकांनी मोठ्या प्रयत्नांनी चालकाचे प्राण वाचवले, याबाबतीत सुपा पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुनिल कुटे यांनी सांगितले की मंगळवारी सकाळी अहमदनगर पुणे महामार्गावर नारायणगव्हाण गावालगत एक टॅंकर पलटी झाला असुन त्यात चालक गुंतला आहे .
घटनेची माहिती कळताच सुनिल कुटे, ओहळ, रमेश शिंदे व दोन होमगार्ड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी टॅंकर गाडी क्रमांक MH 14 KA 2722 ही गाडी परळी वैद्यनाथवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना नारायणगव्हामधील अरुंद रस्त्यामुले चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी एका लाईट पोलवर धडकली व पलटी झाली,गाडी पलटी झाल्यावर चालकाचे पाय गुंतले होते,चालकाचे पाय गुंतलेले पाहुन नारायणगव्हाण मधील युवक शुभम काळे,अक्षय कांडेकर,मनोज शेळके,संभाजी कांडेकर,सादीक शेख यांनी आपल्या जीवाची परवा न करता जाक व इतर साहित्य वापरुन चालकाला बाहेर काढले व त्याला रुग्णालयात दाखल केले,स्थानिक चालकाचे प्राण वाचले.
अहमदनगर पुणे महामार्गावर नारायणगव्हाण व सुपा गावात अजुनही रोडचे काम झाले नाही व तेथे रस्ता दुभाजक नसल्यामुळे असे अपघात नेहमीच होत असतात .याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाल झाली असुन लवकरच तेथे भुसंपादन होणार असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे,अहमदनगर पुणे महामार्गावरील अपघाताची साडेसाती काही केल्या संपेना .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत