Breaking News

सुंदर हस्ताक्षराच्या उपक्रमाला गती देण्याची गरज सरपंच सुधाकर मुसने यांचे मत

 सुंदर हस्ताक्षराच्या उपक्रमाला गती देण्याची गरज सरपंच सुधाकर मुसने यांचे मत

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, बालाजी सुवर्णकार, उदगीर : उदगीर सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असले तरी प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का होण्याबरोबरच शालेय शिक्षणात प्राथमिक कालावधीत विद्यार्थ्यांची हस्ताक्षर सुंदर असलेली काळाची गरज असून ज्ञानज्योती प्रकाशन संस्थेने सुरू केलेल्या विद्यार्थ्यांची हस्ताक्षर सुधारण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला गती देण्याची गरज चांदेगाव येथील सरपंच सुधाकर मुसने यांनी आपली मनोगत व्यक्त केले.

ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेचे वाटप प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी केंद्रप्रमुख शिव शंकर पाटील शाळेचे मुख्याध्यापक मोघेकर ज्ञानज्योती प्रकाशन संस्थेचे मुख्य संयोजक नागनाथ सोमवंशी व प्रकल्पप्रमुक अतिश कळसे यांची उपस्थिती होती सरपंच सुधाकर मुसने पुढे म्हणाली की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची हस्ताक्षर सुधारण्याच्या पुस्तिकेचे कौतुक करून या उपक्रमाला प्रत्येक ग्रामीण भागातील सरपंचांनी पुढाकार घेऊन आपल्या भागातील शाळेतील विद्यार्थ्यांची हस्ताक्षर सुधार मोहिनेला प्रतिसाद दिले तर मुलांची उज्वल भविष्य घडवून नक्कीच विद्यार्थ्यांत गुणवत्ता वाढेल असेही ते म्हणाले.

 यावेळी केंद्रप्रमुख शिवशंकर पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वतोपरी ज्ञानज्योती प्रकाशन संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी उपक्रमाचे प्रकल्प संयोजक नागनाथ सोमवंशी प्रा अतिश कळसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धनंजय गुडसुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजयकुमार गुरखेल यांनी केले या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत