Breaking News

सुपा औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या जिवाशी खेळु नका : अविनाश पवार

 सुपा औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या जिवाशी खेळु नका : अविनाश पवार

 सुपा औद्योगिक वसाहतीतील कामगांरांच्या अनेक जिवघेण्या घटना समोर येत असुन ज्या औदयोगिक वसाहतीला राजकीय ठेकेदारांना भरभराट कामगारांमुळे आली त्यांचे जिवन कवडीमोल झाले असुन पारनेचे न्यायदंडाधिकारी गप्प आहेत कामगांरानां अशा परिस्थितीत मनसे वार्‍यावर सोडणार नाही यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करून सत्य उघड करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी महा घडामोडी न्युज नेटवर्कशी  बोलताना सांगितले.

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठूबे,पारनेर : सुपा औद्योगिक वसाहतीत कंपनी व राजकीय पुढार्याच्या ठेकेदारीने सर्व सामान्य कंपनी कामगारांच्या जिवाची किमंत कवडीमोल झाली हे वास्तव सत्य आहे कंपनी कामगारांच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या कसल्याच उपाय योजना करत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे व हा सर्व प्रकार कंपनी व्यवस्थापण अधिकारी व ठेकेदार चिरीमिरी घेऊन संगनमत करुन कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जो दुर्दैवी घाट घातला आहे त्यामुळे आज सुपा एम आय डिसी मधील कामगार,त्याचं कुटुंब उध्वस्त झाले आहे.

 कंपनी ला फक्त कामगाराकडुन कामं हव आहे त्याच्या कष्टाच्या जिवावर कंपनी आणि मधील ठेकेदार टोळधाडी माले माल झाले आहेत सगळ्यात गंभीर बाब म्हणजे सुपा एम आय डिसी मध्ये वाढलेली परप्रांतीय कामगार संख्या १५ते २० हजारावर आहे त्यांची कुठे नोंद आहे की नाही..? ही गंभीर बाब आहे व याचाच फायदा कंपनी व तिला कामगार पुरवणारे ठेकेदार यांनी उचलला आहे कोण कामगार कुठला कंपनी ला काहीही देणं घेणं नाही फक्त कामं चालु हव त्यामुळेच कामगार ठेकेदार व कंपनी यांच्या जाचाने नैराशेतुन किंवा मानसिक खच्चीकरण करून जिवण संपवतात हे धक्कादायक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने याआधीही कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने आवाज उठवला होता.

 पण कंपनी व्यवस्थापण अधिकारी व ठेकेदार यांचेच अर्थ पुर्ण संबंध असल्याने मुत्यु झालेल्या कामगार बांधवांचा व त्याच्या नातेवाईकांचा आवाज दडपशाहीच्या मार्गाने दाबला जातो ही अतिशय निंदनीय व गंभीर बाब आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे त्यामुळे या घटनांचा गांभीर्याने विचार करुन कामगारांच्या जिविताशी खेळणार्या कंपनी आणि कामगार पुरवणारे ठेकेदार यांच्या वर कामगारांचे शोशन करुन त्याचे कुटुंब उध्वस्त केल्यामुळे ३०२प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी वरिष्ठ पोलिस प्रशासनाला करणार असल्याचे अविनाश पवार मनसे तालुका उपाध्यक्ष पारनेर यांनी सुपा एम आय डिसी मधील कामगारांचे होणारे मुत्यु विषयी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत