ग्रामपचायत कर्मचारी संघटनेचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
ग्रामपचायत कर्मचारी संघटनेचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
सेवा पुस्तिका अद्ययावत करण्याची मागणी..
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, आवाळपूर : गाव स्थळावर ग्रामपंचायत हे मुख्य प्रशासकीय कार्यालय समजल्या जाते. यात प्रशासकीय अधिकारी यांचा सोबत गाव पळीवरील चपराशी ( परिचर ) काम पाहतात. त्यांचा सेवापुस्तिका अद्ययावत नसल्याने कोरपना ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून सेवा पुस्तिका अद्ययावत करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी यांना ग्रामपंचायतीच्या सेवेत घेतल्यानंतर त्यांचे सेवापुस्तीका ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या पुस्तीकेत कर्मच्याऱ्यांच्या सेवा विषयक बाबी, यांच्या नियुक्तीची दिनांक, नियुक्तीची पद्धत, धारण केलेले पद, कर्मचारी वेतन, भविष्य निर्वाह निधी, राहणीमान भत्ता अशा प्रकारच्या नोंदी सेवापुस्तीकामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.
अतिदुर्गम व मागास तालुका समजल्या जात असलेल्या या तालुक्यात 52 ग्राम पंचायत आहे तर त्यापैकी 32 ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येतात. मोजक्या काही ग्राम पांचयती सोडल्या तर बऱ्याचशा ग्रामपंचायचा सेवा पुस्तिका अद्ययावत होणे बाकी आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आपल्या सभेत हा मुद्दा चर्चेत आणत कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून सेवा पुस्तिका अद्ययावत करण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत