चिमुकल्यांनी साकारली राधा - कृष्णाची सुंदर वेशभूषा
चिमुकल्यांनी साकारली राधा - कृष्णाची सुंदर वेशभूषा
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्याने विरु्र स्टेशन येथे घरोघरी उपक्रम
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरुर : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्याने विरुर स्टेशन येथील अहिल्यादेवी चौक येथे चिमुकल्या पूर्वी चिडे व काव्या चिडे यांनी राधाकृष्णाची सुंदर वेशभूषा साकारली.कमी वयातच बालकांच्या कलागुणांचा विकास व्हावा,त्यांच्या अंगी असलेले कलागुण विविध कलांचा माध्यमातून समोर यावे,
त्यांना नवा मंच मिळावा यासाठी अहिल्यादेवी चौक येथे घरोघरी उपक्रम राबविले जाते.श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्याने चिमुकल्या बाळ गोपालाना लक्षवेधी वेशभूषा साकारत गाण्यांच्या तालावर नृत्य,सामूहिक नृत्य सादर करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी धनगर समाजातील सर्व नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत