Breaking News

काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते सुरेंद्र वेलादी यांच्यासह 15 कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत केला भाजपात प्रवेश

 काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते सुरेंद्र वेलादी यांच्यासह 15 कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत केला भाजपात प्रवेश

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे,विरुर : मा.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थित राजुरा येथे सुरेंद्र वेलादी यांच्यासह 15 कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश,विरुर स्टेशन येथील काँग्रेस कार्यकर्ते आदिवासी समाजातील धडाडीचे कार्यकर्ते असे ओळख असणारे श्री सुरेंद्र वेलादी यांच्यासह 15 कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात पक्ष प्रवेश केला. 

मा.वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला. त्यावेळी विरुर स्टेशन येथील भाजपाचे वरिष्ठ नेते भाजपा शहर अध्यक्ष मा. भीमयाजी पाला. सतीश कोमरवेल्लीवार कडूजी दोरखंडे प्रदीप पाला शामराव कस्तुरवार केशव जीवतोडे इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत