Breaking News

सफाई कर्मचारी संतोष उपरे यांचा फळ कापून केला ४९ वा वाढदिवस साजरा

 सफाई कर्मचारी संतोष उपरे यांचा फळ कापून केला ४९ वा वाढदिवस साजरा

माजी तंटा मुक्त अध्यक्ष राजू भाऊ ईग्रपवार यांच्या नवा उपक्रम

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरुर : वाढदिवस म्हटले की एखादे कार्यालय बुकिंग जेवणाच्या पंगती. डिजे आणि येणाऱ्या पाहुण्याचे आदरतिथ्य यानिमित्त लाखो रुपये खर्च केले जातात.परंतु समाजातील ज्या घटकांना अद्यापही मूलभूत सुविधा मिळत नाहीत ते घटक मात्र या सर्व गोष्टीपासून कायमच वंचित राहतो.मात्र एवढेच सर्व डामडौल न करता गावाची वर्षभर स्वच्छ्ता करणाऱ्या ग्राम पंचायत कर्मचारी संतोष भाऊ उपरे यांचा वाढदिवस केक ऐवजी फळ कापून बस स्टॅण्ड चौकात साजरा करण्यात आला राजू भाऊ मित्र मंडळाचे या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांनी सांगितले की स्वच्छता कर्मचारी ऊन वारा पाऊस थंडी यांचा विचार न करता वर्षभर संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याचे कार्य करीत असतात. स्वच्छता कर्मचारी हा समाजाचा मुख्य घटक आहे त्यांनी अहोरात्र मेहनत करून गाव स्वच्छ ठेवल्याने आपण मोकळा श्वास घेतो आणि अशा व्यक्तीचा सन्मान झाला पाहिजे ही भावना मनात ठेवून आपल्या आनंदात त्यांनाही सामील करून घ्यावे यासाठीच हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी व त्यांचे मित्र रामुसिंग टाक यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत