Breaking News

लसीकरणाला सहकार्य करा. लंपी रोगाला पडवा.

 

सरपंच भाग्यश्री आत्राम यांचे गावकऱ्यांना आवाहन

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : विरुर स्टेशन येथे आज लंम्पी रोगाला पळवण्याकरिता मा. सरपंच भाग्यश्री आत्राम यांच्या उपस्थित लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. देशभरात लंम्पी या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे पशुपालकात भीतीचे वातावरण आहे. विरुर स्टेशन येथे अजून पर्यंत तरी संसर्गजन्य आजाराची लागण नसली तरी काळजी घेतली जात आहे विरूर येथील प्रभारी असलेले डॉक्टर कैलाश राठोड यांनी पशुपालकांना लसीकरण करते वेळी काही उपाययोजना सांगितल्या गोटा स्वच्छ ठेवणे गोचीड. मच्छर. 

गोठ्यात राहू नये याकरिता कडुनिंबाच्या पाल्याची गोठ्यात धुनी करावी सायपरमेथिने फवारणी करून गोठा स्वच्छ ठेवावा तसेच शासन प्रशासन स्तरावर लसीकरणासाठी मदत मिळत आहे लंम्पी विषयी मनात अजिबात भीती न ठेवता गोठ्यातील स्वच्छता आणि लसीकरण केल्यास नक्कीच आजार दूर होतो अशी ग्वाही डॉक्टर कैलास राठोड प्रभारी यांनी पशुपालकांना दिले त्यावेळी सरपंच भाग्यश्री आत्राम यांनी पशुपालकाना आपले सर्वच जनावरांना लसीकरण करून ग्यावे कोणतेही पशू लासिकरणापासून वंचित राहू नये ही काळजी घेणे महत्वाचे आहे जर एखाद्या पशू ला लागण झाली असे आढल्यास त्याला कॉरंटाईन करून ठेवावे जेणेकरून हा आजार वाढू नये त्यावेळी डॉक्टर कैलास राठोड यांचासह त्यांची पूर्ण टीम उपस्थित राहून घरोघरी लसीकरण करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत