Breaking News

स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

 स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे 74 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितिचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र वरारकर, सहसचिव विजयराव ताजने, सदस्य श्री. नामदेव पाटील गोहणे तसेच शालेय पोषण आहार समिती चे उपाध्यक्ष श्री.विजय भोयर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मा. मुख्याध्यापक चटप सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 त्यानंतर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र विद्यालय भोयगांव चे मा. मुख्याध्यापक चटप सर, प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितिचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र वरारकर, सहसचिव विजयराव ताजने, सदस्य श्री. नामदेव पाटील गोहणे तसेच शालेय पोषण आहार समिती चे उपाध्यक्ष श्री. विजय भोयर, ज्येष्ठ शिक्षक श्री.बी. झेड. निखाडे, श्री.एम. ए. अरके श्री. ठाकरे सर, श्री. लांडे सर उपस्थीत होते. याप्रसंगी कु. मानसी राजेंद्र वरारकर वर्ग 9 वा व कु. वैष्णवी शंकर लोंढे वर्ग 10 वा या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या प्रसंगी श्री. जी.एम. लांडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाबाबत विस्तृत माहिती दिली तसेच प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व कष्टाने पूर्ण केली तर आपला विकास नक्कीच होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. चटप सर यांनी शालेय उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेवून आपल्या मधिल सुप्त गुणांना वाव देण्याचे आव्हान केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. व्ही.टी. वैद्य तर आभार कु. एस.एन. गाडगे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत