राजुऱ्यातून जाणाऱ्या महामार्गावरचे जीवघेणे खड्डे त्वरित बुजवा.
राजुऱ्यातून जाणाऱ्या महामार्गावरचे जीवघेणे खड्डे त्वरित बुजवा.
- राजुरा तालुका बार असोसिएशनची मागणी.
- रस्त्यांवरील खड्ड्यांकरिता बार असोसिएशन मैदानात.
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, लोकेश पारखी, राजुरा : राजुरा शहरातून दोन महामार्ग जात असून सध्या या महामार्गात जीवघेणे खड्डे पडले आहे.खड्डा चुकवितांना तोल जाऊन अपघाताच्या घटना घडत आहे. खड्डे पडून दोन महिने झाले आहे पण अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. नेत्यांनी सुध्दा मौन धारण केले आहे. त्यामुळे जनतेमध्ये रोष पहायला मिळत आहे. या खड्डयांमुळे जीवितहानी होऊ नये म्हणून तालुका बार असोसिएशन मैदाणात उतरली असून त्यांनी उप विभागीय अधिकारी संपत खलाटे यांना निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.
मागील दोन महिन्यात पडलेल्या पावसामुळे गडचांदूर व तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या दोन्ही महामार्गात असंख्य लहानमोठे खड्डे पडले.दिवसागणिक या खड्डयांचा आकार जीवघेणा होत चालला आहे.या खड्डयांतुन मार्ग काढतांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डयांत पाण्याचे डबके तयार झाल्याने तोल जाऊन अपघाताच्या घटना घडल्या आहे.दरम्यान खड्डे पडून दोन महिने झाले आहे पण आजूनपावतो संबंधित भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग याकडे डोळेझाक करीत आहे.नेत्यांनी सुध्दा चुप्पी साधली आहे.
त्यामुळे व्यवस्थेने जनतेला वाऱ्यावर सोडले का असा प्रश्न निर्माण होत आहे. पण राजुरा तालुका बार असोसिएशनने एक पाऊल पुढे टाकत आक्रमक भूमिका घेतली आहे.त्यांनी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. निनाद येरणे यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी उप विभागीय अधिकारी संपत खालाटे यांची भेट घेऊन निवेदन देत खड्डयांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देतांना ऍड सदानंद लांडे, ऍड. निनाद येरणे, ऍड. अरुण धोटे, ऍड. वाझलवार, ऍड. अर्पित धोटे, ऍड. पिंपडकार, ऍड. पुणेकर, ऍड. देशमुख, ऍड. गिरडकर, ऍड. वाघमारे, ऍड. कुरेशी, मंगेश बोबटे,ऍड. राजेंद्र जेणेकर, ऍड. रवींद्र टिपले,ऍड. मारोती कुरवाटकर आदी वकील मंडळी हजर होती.उप विभागीय अधिकारी खलाटे तातडीची बैठक घेणार असून संबंधित विभागाला खड्डे बुजविण्याबाबत सांगण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत