Breaking News

जि. प. प्राथमिक शाळा वडगाव, येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम संपन्न

 जि. प. प्राथमिक शाळा वडगाव, येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम संपन्न 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सोमेश्वर ढवळे, गडचांदूर : जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा वडगाव येथे दिनांक 2 आक्टोबर 2022 रोज रविवाराला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती योग्य मार्गदर्शन देऊन, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच पूजन करून जयंतीचा कार्यक्रम मोठ्या आंनदात व उत्साहि वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष श्री.श्रीरामजी भोंगळे हे होते, 

तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम भाऊ पाचभाई हे होते, प्रतिष्टीत नागरिक श्री.वासुदेवजी पिंपळकर, लटारीजी धोटे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकवर्ग सौ.ताराबाई टोंगे, श्री.विठ्ठल मडावी, श्री.ज्ञानेश्वर ढवळे, प्रदीप आंबेकर, व इतर गावकरी उपस्थित होते.तसेच शाळेचे मुख्याध्यापक सखाराम परचाके वसंत गोरे सुरेश टेकाम शिवाजी माने अनिल राठोड नितीन जुलमे काकासाहेब नागरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत