पैगंबर हजरत मुहम्मद (स) यांच्या सन्मानार्थ भाषण आणि नातची तालुका स्तरीय बक्षीस स्पर्धा
पैगंबर हजरत मुहम्मद (स) यांच्या सन्मानार्थ भाषण आणि नातची तालुका स्तरीय बक्षीस स्पर्धा
महा घडामोडी न्युज नेटवर्क, माहूर : जामा मस्जिद माहूर मध्ये पैगंबर मोहम्मद स. यांच्या आठवणीत जमीयत ए उलमाए हिंद माहूर यांच्याकडून भाषण व नात पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माहूर तालुक्याच्या सर्व गावाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला, माहूर तालुक्याच्या साठ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. नात पठनात प्रथम क्रमांक ज़ुफिशा कलीमोद्दीन व साॅलेहा सलीम खान - गोंडवळसा , द्वितीय क्रमांक उमैमा खूर्शीद खान - माहूर व तृतीय क्रमांक ओवैस खान नइम खान - माहूर यांनी पटकावलाा.
भाषण स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक अलीना मुजीब फारूकी - माहूर , द्वितीय क्रमांक ज़ैन ज़मीर अहेमद - माहूर तृतीय क्रमांक मोहम्मद फैज़ान अ. कादर - माहूर यांनी पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांना धार्मिक ग्रंथ,एक पुस्तक, ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलेे. माहूर तालुक्याचे तब्लीग जमात चे अमीर मोहम्मद नसीर मोहम्मद जलाल हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. व तसेच हाजी मोहम्मद जलाल, हाजी हाशम मासा, हजी मोहम्मद नूर ,हाजी मोहम्मद रौफ सौदागर, मौलवी जरीफ,हाजी शेख मजहर, हे प्रमुख पाहुणे होते.
कार्यक्रमाचे पंच म्हणून मोलवी खुर्शीद,हाजी मुस्ताफा, मोलवी साजिद,जमीर अहमद होते.कार्यक्रमाचा नियोजन जमियात उलेमा हिंद माहूर चे अध्यक्ष मौलवी युनूस, उपाध्यक्ष सद्दाम, सचिव आजीम सय्यद,जमील, निसार कुरेशी,मोईन ,मजहर, डॉ.जुनेद बावाणी,रोशन भाई,असिफ यांच्याकडून करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलवी वकील व इमदाद यांनी केले आणि आभार प्रदर्शन मौलवी युनूस यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत