Breaking News

साखरपुडा होताच विवाहाची तारीख निश्चित करतांना झाले निकाह (लग्न)

 साखरपुडा होताच विवाहाची तारीख निश्चित करतांना झाले निकाह (लग्न)

 जळगावातिल अनोखा विवाह

महा घडामोडी न्युज जिल्हा विशेष प्रतिनिधी, जिया शेख, जळगाव : जळगाव शाहूनगर येथिल फिरदोस अंजूम शेख जिलानी हिचा साखरपुडा भड़गाव येथील अफजल खान हमीद खान यांच्यासोबत गुरुवार २७ ऑक्टोबरला ठरला होता त्यानुसार वरा सह भडगाव येथून १२ नातेवाईक जळगावी आले दुपारी साखरपुडा संपन्न झाला. साखरपुडा मधे वधू चे बंधू खुर्शीद आलम यांची धावपळ बघून वराकडील हमीद खान, युनुस खान, असलम खान व शेख मोहसीन यांच्या लक्षात काही बाबी आल्या.

 जळगावतील हाजी सत्तार करीम, मौलाना अख्तर सिद्दिकी, याकूब बांगी यांनी विवाहाची तारीख निश्चित करण्याअगोदर जर आजच आपण निकाह (विवाह) लावला तर कसे होईल असा प्रस्ताव वरा च्या नातेवाईकाना सादर केला असता त्यांनी विचार विमर्श करून त्यास त्वरित मान्यता दिली.संध्याकाळी साडेपाच वाजता मस्जिद ए नुर शाहूनगर मधे हा निकाह लावण्यात आला.निकाहसाठी भड़गाव येथील एकूण बारा वराती मंडळी हजर होती तर वधू कडून शाहूनगर परिसरातील मशिदीत येणारे सर्व नमाजी यांची उपस्थिती होती.

वर- वधु कडील मंडळीचे बिरादरी तर्फे गौरव

 जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी या निकाहला उपस्थित राहून वधू व वर या दोघां कडील मंडळींचे त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला.

 मौलाना अख्तर सिद्दिकी यांचे आवाहन

 जळगावत नव्हे तर संपूर्ण देशात जर अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांनी दाखविलेल्या वैवाहिक कार्यक्रमाची अंमलबजावणी आम्ही सर्वांनी केली तर आम्ही सर्व अनैसर्गिक शारीरिक, मानसिक व आर्थिक प्रसंगातुन वाचू व तेच श्रम, वेळ, पैसा इतर चांगल्या कार्यात वापरू शकतात म्हणून प्रत्येकाने अशाच प्रकारचे विवाह करावे असे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत