करंजी पाचदेवळी येथे झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत श्री नंदलाल पंढरी पाटील ह्यांनी मारली बाजी
करंजी पाचदेवळी येथे झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत श्री नंदलाल पंढरी पाटील ह्यांनी मारली बाजी
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून १७ महिन्यानंतर माजी सरपंच श्री जानकिराम देवराम शिमरे हे अपात्र ठरल्यानंतर, आज सरपंच निवडीची प्रक्रिया ग्रामसेवक श्री राठोड भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात पार पडली. ग्रामपंचायतीमध्ये आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ७ पैकी ५ सदस्यांनी पाठिंबा दर्शवत स्पष्ट बहुमताने एक तरुण तडफदार चेहरा श्री नंदलाल पंढरी पाटील यांना निवडून दिले. बोदवड तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गटाचा ) झेंडा फडकल्याने तालुक्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रसंगी बोदवड नगरीचे लोकप्रीय नगराध्यक्ष श्री आनंदा काका पाटील, सोबत नगरसेवक सईद दादा बागवान, नगरसेवक पप्पू भाऊ चव्हाण, गोलू सेठ बरडीया ,हर्षल भाऊ बडगुजर,शरीफ ठेकेदार, लियायकत शेख,जितेंद्र पाटील सर ,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्यासह गावातील गावकरी शशिकांत पाटील, हसन पिंजारी,प्रवीण पाटील, आकाश सुरवाडे, अर्जुन पाटील, दिनकर पाटील,अमोल पाटील, जितेंद्र सुरवाडे,गोपाळ पाटील,कैलास पाटील,बाळू वाघ, सुखदेव पाटील,शकील पिंजारी,बाळू वाघ ,वाल्मिक पाटील, योगेश सोनोने आदी उपस्थित होते.ह्यावेळी सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत