Breaking News

20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत

  20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत

उपतालुकाप्रमुख नितेश महागोकार यांची निवेदाद्वारे मागणी....

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी संतोष मडावी, कोरपना : ग्रामीण भागात गोरगरीब शेतकरी,शेतमजूर,कामगार यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही,जेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घ्यायला लागले अशावेळी 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहतील, आणि त्यामुळे नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकार जर शासनच हिरावून घेणार असेल तर तो निर्णय अत्यंत दुर्देवी आणि चुकीचा होईल.म्हणून 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी युवा सेना कोरपणा उपतालुकाप्रमुख नितेश माहागोकार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना तहसीलदारा मार्फत दिलेल्या निवदनातून केली आहे.

या देशाच्या विकासात ग्रामीण भागातील नागरिकांचे फार मोठे योगदान आहे,आणि 20 च्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्यास राज्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कामगार यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून विद्यार्थी,पालक व शिक्षक यांचे खच्चीकरण करणारी आहे,म्हणून 20च्या आत पटसंख्या असलेल्या शाळा राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातून सांगण्यात आले यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख नितेश महागोकर,गजानन सुरपाम, सुरेश खोबरकर, सूरज डावले, प्रमोद गेडाम, साईनाथ तुमराम, प्रमोद पावडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत