Breaking News

जोशात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले मुख्यधिकाऱ्या वरती माघारी फिरण्याची नाचक्की

 जोशात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले मुख्यधिकाऱ्या वरती माघारी फिरण्याची नाचक्की

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, बोदवड : बोदवड शहरातील अतिक्रमण आता अधिक चिघडत चालेला आहे, यातच बोदवड शहरातील गट. न.२३१ मधील प्लॉट नं २८/२९ / ३० मधील अतिक्रमण बाबत नगर पंचायत कार्यालय मध्ये तीन ते चार तास तक्रादार व जागा मालक यांच्यात चर्चा झाली, परंतु यात कोनताच मार्ग निघाला नाही, शेवटी मुखध्यकारी यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला, आणि तत्काल अतिक्रमण ठिकाणी गेले.

 परंतु तिथे जाताच स्वीकृत नगरसेवक दीपक झाम्बड यांनी नियमानुसार काम करा असे सांगितले, आणि नगर पंचायत प्रशासन धारिवरती घेतले. सदर अतिक्रमण ठिकाणी सत्ताधारी व विरोधी नगरसेवक यांच्यासह पोलिस प्रशासन देखील दाखल झाले होते, एक दिड तास सुरु असलेला ड्रामा शेवटी व नगर पंचायत प्रशासन अतिक्रमण न काढताच तिथुन पंचनामा करून काढता पाय घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत