Breaking News

नोकारी ग्रामपंचायतीचा प्रकार,दोन वर्षापासून दिव्यांग निधीचा वाटपच नाही

 दिव्यांगाना झिजवावे लागत आहे उंबरठे, ग्रामसेवकांची कार्यालयाला दांडी

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,कोरपना : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्राम पंचायत ही सर्वांत खालचा भाग समजला जातो, यात महाराष्ट्र अधिनियम 1961 नुसार अनुसूची 1, 2 नुसार ग्राम पंचायत स्तरावरील 5% निधी हा अपंग व्यक्तीकरिता राखीव ठेवून, तो त्या स्तरावर खर्च करावयाचा असतो. त्याचे अधिकार सुध्दा त्या ग्राम पंचायत स्तरावरावरील सचीवाकडे देण्यात आले आहे. परंतू ग्राम पंचायत नोकारी येथील 5% अपंग निधी वाटप न केल्याने संक्षयाचा भोवरा फिरला असून शंका कुषकाना पेव फुटला आहे.

तालुक्यातील छोटी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेली नोकारी (पाल) ग्राम पंचायत निधी ने मात्र श्रीमंत म्हणून ओळखल्या जाते. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा कर अंदाजे 60 ते 70 लाख येतो, आणि बाकीचा घर टॅक्स ग्राम पंचायतीला प्राप्त होत असतो. त्या पैकी 5% निधी हा अपंगावर खर्च करायचा असतो. मात्र 2020 -21, 2021-22 असे दोन सत्र उलटूनही खर्च न केल्याने दिव्यांगामध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

आमचा हक्काचा निधी आम्हाल द्यावा या करिता वारंवार ग्राम पंचायत कार्यलयात गेले असता, विविध कारणे देवून वाट काढण्याची काम केले, तर कधी वस्तूचे अंदाजपत्रक आना आम्ही निधी देतो, असे म्हणत चालते केले. अजूनही दिव्यांग कार्यलयाची उंबरठे झिजवताना दिसून येत आहे.

ग्रामसेवक हा कार्यालयाला नेहमी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. एवढेच नाही अपंग निधी बाबत विचारणा केली असता, उडवा उडविचे उत्तर देवून चालतं केल्या जाते. विशेष म्हणजे सभेत न आलेल्या सभासदांची स्वाक्षरी घेण्यासाठी चपराश्यांना त्याचा घरी सभा बुक घेऊन पाठवत असल्याची चर्चा गावात आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

 मी स्वतः अपंग असून ग्रामपंचायत मध्ये आमचा निधी बाबत विचारणा केली असता, निधी मिळून जाईल असे सांगितले जाते. परंतू दोन वर्षापासून निधीच मिळाला नाही. : संगीता गणपत देशमुख, नोकारी

 अपंग निधी बाबत उद्याला निधी वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे. : सुभाष सारये, सचिव,  ग्राम पंचायत, नोकारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत