Breaking News

सावली तालुक्यात रानडुकरांचा हौदोस

 सावली तालुक्यात रानडुकरांचा हौदोस

शेतपिकाचे मोठया प्रमाणात नुकसान त्वरित बंदोबस्त करा

त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्याची मागणी

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, योगेश रामटेके, सावली : सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान, पिकाचे उत्पन्न घेत असून, शेतकरी अतिवृष्टी, व रोगराईचा सामना करीत पीक मोठ्या शर्तीने वाढवले,पण आता धान कापनिस आला असून, ऐन कापणीच्या वेळेत जंगलव्याप्त परिसरात रानडुकरांचा, व इतर जंगली प्राण्याचा मोठया प्रमाणात धान, मका, चना, या पिकाांवर हौदोस वाढला आहे. शेत पिकाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे,जंगली प्राण्याचा उपद्रव वाढल्याने शेतकरी आपल्या शेतमालाची कटाई करीत आहेत,पण वनविभागाच्या नियमानुसार ज्यांचे नुकसान झाले असेल, पण त्यांनी शेतमालाची कटाई केली त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, यामुळे शेतकरी बांधवासमोर मोठे संकट आले आहे.

 आमच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,अर्धे पीक रानडुकराने फस्त केले असून,त्या भीतीने आम्ही धानाची कापणी करीत असून, वन विभागाचे अधिकारी म्हणतात की, कापनी केल्यावर काही नुकसान भरपाई भेटणार नाही, व पंचनामे सुद्धा होणार नाही. मग आम्ही काय करावे ? : मुखरू बोरकुटे, शेतकरी, गव्हारला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत