Breaking News

भेदोडा येथील कॉग्रेसचे श्री.मुरलीधर कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांचेसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

 भेदोडा येथील कॉग्रेसचे श्री.मुरलीधर कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांचेसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

भाजपा पदाधिकारी यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून केले स्वागत

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,लोकेश पारखी,राजुरा : भेदोडा ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत कॉग्रेस पक्षातर्फे श्री.मुरलीधर कांबळे निवडून आले होते,पालकमंत्री ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज भैय्या अहिर, राजुरा विधानसभेचे माजी आमदार संजय धोटे, चंद्रपूर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष श्री देवराव दादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चंद्रपूर युवा मोर्च्या चे जिल्हा सचिव श्री. दिलीप भाऊ गिरसावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या नेतृत्वात भेदोडा येथील कॉग्रेसचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री.मुरलीधर कांबळे तसेच श्री. शंकर मानपल्लीवार माजी ग्रामपंचायत सदस्य, राजेश भगत जेष्ठ कार्यकर्ता, साई तुल्लावार , 

गणपत देबटवार, बबन लोखंडे, खुशाल दुर्गे, बाबुराव खेडेकर, भिकाराम कांबळे,राजकुमार देबटवार,आणि असंख्य कॉंग्रेस कार्यकर्ते यांनी भाजपाचे माजी जिल्हापरिषद सभापती तथा राजुरा भाजपचे तालुका अध्यक्ष श्री सुनील भाऊ उरकुडे,जेष्ठ कार्यकर्ते जिल्हा सदस्य अरुण मस्की,जेष्ठ कार्यकर्ते भाऊराव चंदनखेडे, जिल्हा सचिव हरिभाऊ झाडे,भाजपाचे तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, राजुरा युवा तालुकाध्यक्ष सचिन शेंडे,माजी राजुरा नगरपरिषद सदस्य राजू डोहे, जिल्हा महामंत्री ओ. बी.सी मोर्च्या संदीप पारखी ,चुनाळा ग्रामपंचायत सदस्य रवी भाऊ गायकवाड, गणेश दुर्गे, अंजु बिल्लावार, बोरूले भाऊ याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी यांनी भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले व तसेच पक्ष वाढीसाठी आपल्या माध्यमातून उत्तम कार्य करावे असे बोलताना मान्यवरानी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत