बेटावद खुर्द येथील रोहन लोखंडे यांना प्रयोगशील कृषी विस्तार कार्य पुरस्कार जाहीर
बेटावद खुर्द येथील रोहन लोखंडे यांना प्रयोगशील कृषी विस्तार कार्य पुरस्कार जाहीर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सतीश बाविस्कर, जळगाव : जामनेर तालुक्यातील कृषी क्षेत्राच्या शिरपेचात मानाचे अजुन एक मोरपंख बेटावद खुर्द येथील भूमिपुत्र रोहन लोखंडे यांना प्रयोगशील कृषी विस्तार कार्य पुरस्कार जाहीर 25 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण सोहळा ह्यमन सर्विस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे यात ह्यमन सर्विस फाऊंडेशन यांच्या वतीने कृषी थोन युवा सन्मान पुरस्कार चे आयोजन करण्यात आले असून याच निवड समितीने जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील श्री रोहन दिलीप लोखंडे यांची कृषी क्षेत्रातील कार्यालयाची दखल घेऊन प्रयोगशील कृषी विस्तार कार्य या पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे दि 25 नोव्हेंबर 2022 रोजी नाशिक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे श्री रोहन लोखंडे यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त असे कृषी साहित्य अनेक वृत्तपत्रातून प्रकाशित केले आहे नाफेड अंतर्गत गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी विस्तार कार्य ते करत आहेत त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत