Breaking News

अब्दुल गणी पटेल विद्यालय देवाडाचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

 अब्दुल गणी पटेल विद्यालय देवाडाचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सुभाष अलगमकर, राजुरा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये घेतल्या गेलेल्या परीक्षेत राजुरा तालुक्यातील देवाडा येथील अब्दुल गणी पटेल विद्यालयाच्या इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयचे एकूण सहा विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहे यात ज्योती निकुरे, मानसी गणफाडे, काजल हरणधरे, गायत्री फड, जिशा शेख व कार्तिक गणारपू हे विद्यार्थी यशस्वी ठरले असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, मुख्याध्यापक प्रकाश गिरसावळे, यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत व मार्गदर्शक शिक्षक हिनेश जाधव, रमेश राठोड, किसनदास पिपरे, प्रदीप उपरे, आकाश ढवळे, शिक्षिका निलिमा सुर, दुर्गाश्री वाढई यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. डोंगराळ व अतिदुर्गम क्षेत्र समजल्या जाणाऱ्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील सुप्त गुण दडलेली आहे त्यांना योग्य मार्गदर्शन व विविध स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणे गरजचे आहे असे यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत