येवती येथे लम्पि आजाराचा कहर थांबेना
येवती येथे लम्पि आजाराचा कहर थांबेना
आठ दिवसात दोन बैलांचा मृत्यू
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तालुक्यातील येवती येथील शेतकरी राजेंद्र समाधान शिंदे यांच्या पंधरा वर्षांच्या बैलांचा लम्पी आजारामुळे मरण पावला. बैलाची किंमत 60 हजार रुपये होती मागील आठरा दिवसांपासून त्यांच्या बैल बाधित होता. परंतु डॉक्टर लोकांना फोन लावून सुद्धा वेळेवर न आल्यामुळे त्या बैलांचा मृत्यू झाला उपचारास प्रतिसाद न दिल्याने मरण पावला. या बैलांची शवविच्छेदन बोदवड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ दिपक साखरे डॉ वैभव पाटील सागर माळी यांच्या मार्फत पशुधन विकास अधिकारी डॉ दिपक साखरे यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
त्या नंतर या बैलांचा मृतदेहास खड्डा करून पूरण्यात आले. यावेळी गावातील सरपंच शांताराम वाघ व राजू शिंदे पंडित वाघ विकास शिंदे शिवाजी वाघ दत्तात्रय शिंदे विकास शिंदे गजानन कुंभार गजानन बावस्कर प्रल्हाद वाघ नारायण ठाकूर संतोष कचोरे राजाराम कचरे अशोक सुकाळे समाधान शिंदे राहुल बावस्कर इत्यादी उपस्थित होते तालुक्यातील लसीकरण बहुतांशी पूर्ण झाले असून या कामी खाजगी पशुधन पर्यवेक्षकांची मदत झाली असून अजूनही उपचारासाठी शासकीय यंत्रणेस त्यांचे सहकार्य होत आहे.
तर तिन ते चार दिवस पहिले डॉक्टर ला कॉल करून सुद्धा डॉक्टर येत नाही डॉक्टर ला विचारल्या असतात डॉक्टर सांगतो मी पीएम करत आहे मी या गावाला आहे त्या गावाला आहे असे डॉक्टर लोक उडवा उडविचे उत्तर देतात तरी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तत्काळ या गावांमधील लम्पी ग्रस्त बैलांच्या उपचार करावा असे आव्हान नागरिक करीत आहे आजपर्यंत तालुक्यात ११५६ जनावरे लंम्पीने बाधित असून 90 जनावरांना मृत्यू झाल्याचे पशुधन विकास अधीकारी डॉ दीपक साखरे यांनी माहिती दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत