बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
विरुर वनपरिक्षेत्रातील एका महिन्यातील दुसरी घटना; जनतेत आक्रोश
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सुभाष अलगमकर, राजुरा : तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्रात येत असलेल्या लक्कडकोट बिट क्रमांक 48 मध्ये जंगल लगत असलेल्या शेतात जंगु कुरसंगे वय 55 वर्षे नामक व्यक्तीला बिबट्याने ठार केले सदर घटना दि 3 रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडल्याचे समजले,
मृत व्यक्ती लक्कडकोट जवळील आनंदगुडा येथील असून शेतातून काम आटोपून घरी जाण्यास निघत असता वेळी या खुंकार बिबट्याने व्यक्तीवर हल्ला करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली इतकी भयानक घटना पाहून जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहेत, या बिबट्याला लवकर जेरबंद करा अन्यथा त्याचा बंदोबस्त करण्यास आम्हाला परवानगी द्या अशी लोकांमध्ये मागणी जोर धरू लागली आहे.
विरुर वनपरिक्षेत्रातील एका महिन्यातील ही दुसरी घटना असून 6 नोव्हेंबर रोजी तुंमागूडा सुबई येथील एका शेतकऱ्यांला ठार केले व काही दिवसांपासून अमृतगुडा परिसरात बिबट धुमाकूळ घालत घालत असल्याची वार्ता आहे यावरून वनविभाग या प्राण्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरल्याचे समजते. सदर घटनेतील मृत व्यक्तीच्या पच्छात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार असून विरुर क्षेत्रातील पोलीस कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून पुढील कार्यवाही करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत