विठ्ठल गोंडे यांना 2022 चा राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान
शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची राज्य स्तरावर दखल.
नांदा गावाच्या तुऱ्यावर मानाचा सन्मान
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,कोरपना : 28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले मूळ नांदा गावातील राहिवाशी असलेल्या विज्ञान विषय शिक्षक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विट्ठलवाडा येथे कार्यरत श्री. विठ्ठल किसन गोंडे यांना सामाजिक, शैक्षणिक उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यां प्रती बांधिलकी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,सामाजिक उद्बोधन असे विविध कार्य करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, हातकणंगले लोकसभा मतदान संघाचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, डॉ. सुरेशराव जाधव, माजी आमदार राजीव आवळे, विजया कांबळे, डॉ. राजेंद्र दास, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, महादेव निर्मळे, सूरज वाघमारे या मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल किसन गोंडे विज्ञान शिक्षक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, यात कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र, पाच हजार रुपये किमतीची पुस्तके प्रदान करण्यात आली. या राज्यस्तरीय पुरस्कार समारंभात संपूर्ण महाराष्ट्रातून ९०० नामांकन आले होते त्यात सर्वोत्कृष्ट ५० व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.अशी माहिती प्रकाशक अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत