रुग्णवाहीका उभ्या ट्रकला धडकली,अपघातात मुडझा येथील रुग्ण जखमी
मद्यपी रुग्णवाहिका चालकाची चाल आनं गरीब रुग्णाचे हाल
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, ब्रम्हपुरी : दिनांक १२ डिसेंम्बर २२ सोमवार "भाऊचा बर्थडे" आणी तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली. ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित हायड्रोसील तपासणी शिबिरात मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने ह्या केंद्राशी संलग्न गावांतील गरीब रुग्णांना शस्त्रक्रिया करून घेण्यास पाठवले होते. संबंधित रुग्णांची तपासणी झाल्यानंतर त्यांना मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन चालक सुनील मारवाडे हे रुग्णवाहिकेने परत मुडझा येथे घेऊन येत असतांना ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील,शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभुकृपा राईस मिल जवळ भीषण अपघात झाला व ह्या गरीब रुग्णांना गंभीर दुखापत होऊन त्यांना परत ब्रह्मपुरीत रुग्णालयात उपचारासाठी हलवावे लागले.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केल्या गेले होते.त्यात तालुक्यातील गोर गरीब जनतेला आरोग्य शिबिराचे लाभ मिळणार असल्याने, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लाभार्थ्यांना ब्रम्हपुरी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व नियोजित कार्यक्रम दिवसा संपल्याने सायंकाळी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन आप आपल्या क्षेत्रात परतीला निघाले मात्र मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे वाहन चालक श्री. सुनील मारवाडे हे "बर्थडे लाभार्थी" दारू पिऊन बेधुंद अवस्थेत रुग्णवाहिका चालवत असल्याने शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उदापूर गावा समोरील प्रभुकृपा राईस मिल जवळ मुख्य मार्गांवरील उभ्या ट्रकला जबर धडक दिल्याने रुग्णवाहीकेचा भीषण अपघात झाला.
रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या ह्या वाहनचालकाची ही मद्यधुंद अवस्था ह्यापूर्वी सुद्धा मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर्स ह्यांनी अनुभवली आहे व त्याबद्दल वरिष्ठ स्तरावर तक्रारी झाल्या आहेत, मात्र ह्या वाहनचालकावर प्रशासनाने कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नाही, त्यामुळे ह्या वाहनचालकाची मग्रुरी वाढत जाऊन ते वारंवार अशा रीतीने मद्यपान करून रुग्णवाहिका चालवतात.जर ह्या वाहन चालकावर वेळीच कारवाई केल्या गेली असती तर आजचा प्रसंग टळला असता. आज मुडझा गावातील रुग्णांचा जीव धोक्यात घातल्या गेलाय उद्या इतर क्षेत्रातील रुग्णांचा सुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो.
प्रस्तुत प्रकरणात फक्त वाहनचालक जबाबदार नसून, तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत ज्यांनी वेळीच ह्या दारुड्या वाहनचालकाच्या वर्तनानुसार कडक कारवाई केली नाही हे सुद्धा दोषचं आहे .! त्यामुळे नागरिकांच्या विनंती नुसार ह्याप्रकरणात दोषी वाहनचालकाला तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी ह्यांनी कारवाई करतं त्वरित निलंबित करावे व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी जेनेकरून भविष्यात अशा घटनांला चाप बसेल व ग्रामीण क्षेत्रातील गरीब, दलित, वंचित, गरजू रुग्णांच्या जीवाशी खेळण्याची हिंमत कुणी परत करणार नाही.!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत