राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त उपरवाही येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले
राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त उपरवाही येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, गडचांदूर : स्वराज्य युवा मंडळ व अंबुजा सिमेंट फाऊंडेशन यांचा संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांचा जयंतीचे अवाचीत्य साधात उपरवाही येथे रक्तदान व रक्तगट, रक्तदाब तपासणी शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी गायकवाड प्रोजेक्ट मॅनेजर आर के सी, श्रीकांत कुंभारे प्रोजेक्ट मॅनेजर अंबुजा फाऊंडेशन, गिताताई शिडाम सरपंच उपरवाही, रक्तसंक्रमन अधिकारी पवार, डी बी बोडे, अशोक तलांडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उपरवाही, लक्ष्मण बोंडे पोलीस पाटील उपरवाही, व अशोक बोंडे तमुस अध्यक्ष उपरवाही, बेले मुख्याध्यापक जि. प.शाळा उपरवाही, व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी २५ युवकांनी रक्तदान केले तर ५५ नागरिकांनी रक्तगट व रक्तगट तपासणी केली. संचालन सुभाष बुऱ्हान यांनी केले तर आभार गणपत गाडगे यांनी मानले. यावेळी स्वराज्य युवा मंडळाचा पदाधिकारी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत