Breaking News

महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचे पिंजरे धोकादायक स्थितीत ; पर्यटकांचा जीव धोक्यात

 130 वर्षे जुन्या प्राणिसंग्रहालयाला अद्यावत करणे गरजेचे

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नागपूर : नागपुरातील 130 वर्षे जुन्या असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालय खिळखिळे झाले आहे. या प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळं याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आलाय.

नागपुरातील (Nagpur) महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला 130 वर्षे पूर्ण झालेय. विदर्भातील आकर्षणाचं केंद्र असलेले हे प्राणीसंग्रहालय मात्र आता खिळखिळे झालेय. निधी अभावी या प्राणीसंग्रहालय विकास खुंटलाय. परिणामी प्राणी असलेले पिंजरे गंजलेय, काही ठिकाणी तुटले आहेत, धोकादायक स्थितीत आहे.

नव्या नियमानुसार प्राणी असलेल्या ठिकाणी पिंजरे न करता खंदक करणे आवश्यक आहे. यासाठी महाराजबाग प्रशासनाने सरकारकडे 84 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिलाय. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळं प्राणिसंग्रहालयाची स्थिती वाईट आहे.

यापुर्वी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यातून प्राणी बाहेर आल्याच्या घटना घडल्याय. सुदैवानं यात प्राणहानी झाली नाही. पुन्हा तशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.

नागपूरात निच्‍चांकी तापमानाची नोंद; प्राणी संग्रहालयात लावले हिटर

सध्या हुडहुड भरणारी थंडी असून मोसमातील निच्‍चांकी तापमानाची नोंद आठवड्याच्‍या सुरवातीला झाली आहे. नागरिक (Nagpur News) थंडीपासून बचाव करण्याकरिता गरम कपडे, शेकोटीचा वापर करत आहे.

राज्‍यात सर्वाधिक तापमान (Temperature) असलेले नागपूर (Nagpur) सध्‍या थंडीने गारठले आहे. मागील काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असून आता थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्‍या मोसमातील निच्‍चांकी तापमानाची नोंद झाली आहे. महाराजबाग प्राणी संग्रहालयाने पर्यटकांसाठी प्राणीदर्शनाच्या वेळांमध्ये देखील बदल केला आहे.

प्राणी संग्रहालयात हिटर

नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांना थंडीपासून बचाव करण्याकरिता प्राण्यांच्या पिंजरा बाहेर हिटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रात्री आणि सकाळच्या थंडीच्या वेळी प्राण्यांना पिंजराच्या मागील भागात आणून त्यांना हीटर मध्ये ठेवले जात आहे. सोबतच त्यांच्या पिंजऱ्यात पाला पाचोळ्याची व्यवस्था केली आहे. जेणेकरून त्यांना नैसर्गिक गर्मी मिळेल; यासोबतच त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत