Breaking News

बेला येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती तिथी नुसार साजरी

 बेला येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती तिथी नुसार साजरी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : मराठ्यांचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार बेला येथे शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नटराज क्रीडा मंडळाच्या पटांगणातून निघालेल्या या शोभा यात्रेला सर्वच राजकीय पक्षातील नेत्यानी हजेरी लावली होती. शिवसेनाप्रमुख सतीश मुंजे यांनी विधिवत पूजा करून जय शिवाजी जय भवानीच्या गर्जना ने पूर्ण बेलानगरी भगवीमय झाली होती. 

राजाधिराज च्या वतीने खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ढोल ताशाच्या स्वरूपात नूत्य करणारे विलोभिनीय संगीत अनेकांची मने आकर्षित करीत होती.पिपळाचे सरपंच प्रशांत पाहुणे यांचा कलाकारांनी शिवाजी महाराज व जिजाऊ ची वेशभूषाधरी ची उत्कृष्ट अभिनय केला. ह्या सोहळ्याप्रसंगी बेला ग्रामपंचायतचे सरपंच श्री. अरुणजी बालपांडे, उपसरपंच श्री. प्रशांत लांबट, काँग्रेसचे नेते श्री. संजय मेश्राम, सावंगी ग्रामपंचायतचे सरपंच मनोज जी जयस्वाल हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी साठी सतीश मुंजे, निरज गवते, प्रभाकर महाकाळकर, पवन चावरे, चेतन जोगे, मयूर गंधारे अरविंद मेंडुले, विवेक तायवडे प्रीतम उराडे, आदी शिवसैनिकांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत