Breaking News

पिपळा येथे तुकाराम महाराजांचां बीज महोत्सव संपन्न

पिपळा येथे तुकाराम महाराजांचा बीज महोत्सव संपन्न

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोदकुमार डांगरे, बेला : बेल्यापासून नजीकच्या पिपळा येथील संदीप धांद्ररे यांच्या पुढाकाराने 1914 पासून तुकाराम बीजचा मोठा महोत्सव साजरा करण्यात येते. वारकरी भक्ताचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीला वाजत गाजत भक्ती भावाने रामकृष्ण देशमुख यांच्या घरून पालखी सोहळ्याला सुरुवात झालीी, संपूर्ण गावाला भ्रमण करीत असताना परिसरातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. नांद नदीच्या तीरावर पालखीला नेण्यात येऊन मोठ्या भक्ती भावाने विधिवत पूजन करण्यात आले.

 त्यानंतर भक्त संदीप धंदरे यांच्या घरी येऊन पालखी स्थिरावली. या ठिकाणी मोठ्या भाविकांनी दर्शन घेतले, सोबतच किर्तन, भजन पूजन, हरिपाठाचे वाचन सुद्धा करण्यात आले.वारकरी भजन मंडळी विना वादक श्रावण समर्थ, मधुकर पोफारे, अरुण बेले, विठ्ठल बावणे, गुलाब कार मोरे, गोपाळा गुंडे, नारायण कोल्हे, गोलू देशमुख, दिना भुजाडे, गणेश भुजाडे, मोरेश्वर बावणे, भूषण भुजाडे, व इतर भाविक मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते, महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत