चंद्रपूरकरांनो सावधान : जिल्ह्यात चोरांचा झालाय सुळसुळाट
चंद्रपूरकरांनो सावधान : जिल्ह्यात चोरांचा झालाय सुळसुळाट
खैरगाव चानसूरला येथे एकाच दिवशी चार ठिकाणी जबर धाडसी चोरी
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, बंडू पहानपट्टे, चंद्रपूर : खैरगाव चानसूरला येथील दिनांक 7/4/23 ला मध्यरात्री एकाच दिवशी चार ठिकाणी जबर धाडसी चोरी झाली. यामध्ये सर्वात प्रथम गावातील नागरिकाकडून सांगण्यावरून प्रथम किसनजी झाडे यांच्या शेतातील घर फोडले चोरट्यांनी बिडा व कुराड चोरून नेली .त्यानंतर प्रभुदास जाधव यांचे घर फोडून अंदाजे एक ते दीड लाख रुपये चे सोन्याचे दागिने चोरीला घे गेले आहे असे सांगण्यात येत आहे,
हेही वाचा : नगर परिषद ब्रम्हपुरी द्वारा शासकीय निधीचा दुरउपयोग होत आहे का ?
तिसऱ्या घरी एकनाथ शिडामे यांचे सहा नग कोंबडे चोरून नेले त्याची अंदाजी किंमत दहा ते पंधरा हजार रुपये आहे असे घर मालकांनी सांगितले. चौथ्या घरी एम एस एफ चे कर्मचारी यांच्या घरी चोरी केली आहे परंतु त्यांचे गावाला गेले असल्यामुळे अजून त्यांच्या घरातील चोरीचा मुद्देमाल किती गेला अजून काही कळालेले नाही या सर्व घटना क्रमानुसार गावातील सर्व गावकरी झाली आहे व गावातील सगळी भीतीचे वातावरण तयार झाले आहे सर्व गावातून या चोरीचा पोलिसांनी त्वरित छडा लावून या चोट्यांना त्वरित गजाआड करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत