चंद्रपुरात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 2 ठार, 4 जखमी
चंद्रपुरात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 2 ठार, 4 जखमी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नागभीड तालुक्यातील सातबहिणींचा डोंगर येथील ही घटना आहे. अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे असं मृतांचं नाव असून, त्या दोघांचं वय अंदाजे 60 वर्ष आहे. मधमाशांनी अचानक हल्ला केला. हा डोंगर उतरण्यासाठी अतिशय अवघड असल्यानं ते डोंगर उतरू शकले नाहीत आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : चंद्रपूरकरांनो सावधान : जिल्ह्यात चोरांचा झालाय सुळसुळाट
डोंगरावर महादेवाचं मंदिर
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागभीड तालुक्यात सातबहिणीचा डोंगर म्हणून एक ठिकाण आहे. या डोंगरावर महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. मात्र या डोंगरावर मोठ्याप्रमाणात मधमाशांची पोळी आहेत. काल दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा : नगर परिषद ब्रम्हपुरी द्वारा शासकीय निधीचा दुरउपयोग होत आहे का ?
खाली उतरता न आल्यानं मृत्यू
अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे असं मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचं नाव आहे. हा डोंगर खाली उतरण्यासाठी अतिशय अवघड असा आहे. त्यामुळे जेव्हा मधमाशांचा हल्ला झाला तेव्हा त्यांना खाली उतरता आले नाही. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री आकराच्या सुमारास त्यांचा मृतदेह एनजीओच्या मदतीनं डोंगराच्या खाली आणण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत