मे. गीता इंडस्ट्रीज कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग, जसापुर येथे लाखोचा कापूस जळून खाक
मे. गीता इंडस्ट्रीज कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग, जसापुर येथे लाखोचा कापूस जळून खाक
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, सोनेगाव लोधी : नजिक असलेल्या जसापूर येथील मे गीता इंडस्ट्रीज कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग या कापूस फॅक्टरीला रात्री अचानक आग लागल्याने आठ करोडचा कापूस जळून खाक झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग 44 वर असलेल्या सोनेगाव शिवारातील जसापुर येथील कापूस जिनिंग फॅक्टरी ला 28 मे ला रात्री 10.30 सुमारास अचानक आग लागल्याने सुरक्षा रक्षका ची भंबेरी उडाली. बेला, हिंगणघाट, व वर्धा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या.अग्निशामक दलाने सकाळी 9 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.
यात जवळपास 8 हजार क्विंटल कापूस जळुन खाक झाला.आगीचे नेमके कारण कळले नसले तरी यात कापूस जळून राख झाल्याने जवळपास आठ कोटीचे नुकसान झाल्याचे गीता इंडस्ट्रीजच्या सूत्रांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार अजित कदम सोबत हेड कॉस्टेबल सुरेंद ठाकरे करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत