188 नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ
द्वितीय स्मृति दिनी सामाजिक बांधिलकी जोपासत दिवे-शेंडे कुटुंबियांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नांदाफाटा : स्व. प्रभाकरजी दिवे तथा स्व. दिलीप शेंडे यांच्या द्वितीय स्मृती दिनांनिमित्य आवाळपूर येथे दिवे-शेंडे मित्रापरिवार तथा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचा वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये 155 नागरिकांनी आरोग्य तपासणी तथा 33 नागरिकांनी विविध रक्त चाचण्या घेण्यात आल्या. एकूण 188 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी प्रसिद्ध प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉ. समृद्धी आईंचवार यांची मुख्य उपस्थिती होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य रत्नाकर चटप, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम निब्रड, कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास दिवे, डॉ. स्वप्नेश चांदेकर, आवाळपूर ग्रामपंचायतीचा सरपंच प्रियांका दिवे, पालगावचे सरपंच अरुण रागीट, यादवजी, आवाळपूर चे उपसरपंच बाळकृष्ण काकडे, ग्रा. प. सदस्या सुश्मिता पाणघाटे, ग्रामपंचायत सदस्य कल्पतरू कन्नाके, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पीयूष वनकर, बाबाभीम उमरे, भाविक उमरे, विठ्ठल गोंडे, राजेश धांडे, बादल दिवे आदी मान्यवर उपस्थिती होते.
यावेळी मान्यवरांनी स्व. प्रभाकरजी दिवे तथा स्व दिलीप शेंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व. प्रभाकरजी दिवे साहेब व स्व. दिलीप शेंडे या दोघांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य केले असून त्यांचा आदर्श समाजानी घेतला पाहिजे असा सल्ला रत्नाकर चटप यांनी नागरिकांना दिला. दिवे-शेंडे कुटुंबियांनी अतिशय चांगला सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम हाती घेतला असून दरवर्षी 31 मे ला विविध लोक उपयोगी कार्यक्रम घेण्याकरिता आवश्यक ती सर्व मदत करू अशी ग्वाही यावेळी बोलताना पुरुषोत्तम निब्रड यांनी आयोजकांनां दिली.
सेवानिवृत्त केंद्र प्रमुख पियुष वनकर यांनी सुद्धा नागरिकांना जुन्या आठवणी सांगत त्यांचा आठवणींना उजाळा दिला. शिबिरामध्ये मोफत ब्लडशुगर, ब्लडप्रेशर ( BP),ब्लड ऑक्सिजन लेव्हल,हेल्थ स्क्रीनिंग, ब्लड ग्रुप तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ. समृद्धी आईंचवार (प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ) यांनी गावातील महिलांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी डॉ. अभिलाश पाटील,डॉ. मृणाली माने, डॉ. अनघा पाटील डॉ. संकेत शेंडे, डॉ. वैष्णवी अशटूनकर, डॉ. निशांत मेश्राम, डॉ. अबोली वाटेकर, डॉ. सुरक्षा वहाने यांनी नागरिकांना सर्व रोगा विषयी मार्गदर्शन तथा सहकार्य केले. लक्ष्मी ब्लड कलेक्शन सेंटर नागपूर मार्फत थायराईड, लिपिड प्रोफाइल, आजाराच्या रक्त चाचण्या अत्यंत माफक दरात करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश जमदाडे,सुशील तेलंग,अखिल अतकारे अक्षय माणुसमारे, स्वप्नील मूगुल, मोहन भोयर, ओम सुर, स्वप्नील कडुकर, गौतम खाडे,दत्ता गोहकार, साहिल नगराळे,मयूर वाटेकर,वैभव दिवे, नितेश शेंडे, ग्रामपंचायत आवाळपूर चे सर्व कर्माचारी, अंगणवाडी सेविका, आशावर्क तथा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचा सर्व सदस्यांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत