Breaking News

गौण खनिज तस्कर वरोडयाचा पोलीस पाटिल दक्षता समितीत

 गौण खनिज तस्कर वरोडयाचा पोलीस पाटिल दक्षता समितीत 

बेचाळीस हजार दंड थकवीला, अवैध विटा भट्टीचा धंदा जोमात

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा बसण्यासाठी 2 नोव्हेंबर 2022 ला तहसीलदार राजुरा यांनी मंडळ निहाय पथके स्थापन केली 21 एप्रिल 2023 रोजी परत आदेश करुन कुशाब मुरलीधर पोडे यांचेही नाव पथकात समाविष्ट करण्यात आले अवैद्य विटा भट्टी, चालविणे गौण खनिज तस्करी करणे, अवैध रेती तस्करी खुद्द राजुरा तहसीलदारांनी दंड थोटाविला असतांनाही कापनगाव, माथरा, मारडा या परिसरातील अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी चक्क रेती तस्कर वरोड्याच्या पोलीस पाटलाची निवड करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अवैद्य गौण खनिज तस्करी व अवैध विटा भट्टी चालविणाऱ्या पोलीस पाटलावर कारवाई करुन पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

42 हजाराचा दंड थकविला

पोलीस पाटील कुशाब पोडे यांचे विटा भट्टी नजदिक वरोडा शेत शिवारात शेत सर्वे क्रमांक 110 मध्ये 5 ब्रास विना खनीज परवाना रेतीची साठवणूक केल्याने याप्रकरणी तहसीलदार राजूरा यांनी 2018 मध्ये चौकशी करून दंड थोटाविला होता सदरचा 42 हजार रुपयाचा दंड अद्याप पावतो भरला नसून थकीत आहे

 महसूल प्रशासनाचा गजबचा आदेश

 राजुरा तालुक्यातील उत्खनन व वाहतुकीला आळा बसावा याकरिता 4 नोव्हेंबर 2022 रोजी दक्षता पथक तयार करण्यात आले यात कुशाब पोडे यांचे नाव नव्हते परत दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी वरोडा येथील पोलीस पाटील कुशाब पोडे यांचे एकट्याचेच नाव पथकात समाविष्ट करण्यात आले तस्करी प्रकरणात नाव असतांना महसूल प्रशासनाने केलेली निवड वादाच्या भोवऱ्यात आली असून राजुरा महसूल विभागाचा गजबचा आदेश दिसतो तस्करी करणाऱ्या व्यक्तीची निवड झाल्याने गौण खनिज तस्करीला आळा बसण्याऐवजी तस्करीत वाढ झाली आहे पथकामध्ये नाव असल्याने अनेक ट्रॅक्टर मालकाकडून पैसे उकळणे, दारू पिणे, पार्ट्या करणे असा सर्रास धंदा सुरू असल्याची चर्चा आहे तक्रारीनंतर महसूल विभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 माझे नावाने दंडाबाबत जो आदेश काढण्यात आला होता त्याचे उत्तर तहसील कार्यालयाला दिले आहे लेबर मिळाले नसल्याने विटा भट्टीचा व्यवसाय बंद आहे. - कुशाब पोडे, पोलीस पाटील,वरोडा

 पोलीस पाटील असल्याने पथकात निवड केली आहे माझ्या प्रतिक्रियाचे गरज नाही -  हरीष गाडे, तहसीलदार,राजुरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत