राजुरा तालुक्यातील कृषी केंद्र मार्फत मिरचीचे बियाणे अवैधरित्या वाढीव दराणे विक्री
राजुरा तालुक्यातील कृषी केंद्र मार्फत मिरचीचे बियाणे अवैधरित्या वाढीव दराणे विक्री
- कृषी विभागाचे दुर्लक्ष
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, लोकेश पारखी, राजुरा : सध्या मान्सून ची लगबग आल्याने शेतकरी आपल्या शेतात पेरणी कराव्याचे बी बियाने खरेदी करण्याच्या लगबगीत आहेत. अश्यातच राजुरा तालुक्यातील काही कृषी केंद्र मार्फत मिरचीचे बियाणे मनमानी दरात विक्री सुरु असून यावर कोणाचाही अंकुश नाही. वाढीव अवैध दराबाबत कृषी विभाग अनभीज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.आणी कृषी केंद्र संचालक व कृषी विभागाचे अधिकारी यांचे काही आर्थिक मधुर संबंध तर नाही ना अशी शंका सुद्धा चंदनखेडे यांनी यावेळी उपस्थित केली आहे.
तीनशे पन्नास रुपये किंमतीचे मिर्ची चे बियाने तब्बल पंधराशे ते सोळाशे रुपये जादा दराने अवैधरित्या विकल्या जात असून मोठया प्रमाणात कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांची अवैधरित्या आर्थिक लूट केल्या जात असल्याचे निवेदन भाऊराव चंदनखेडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी यांनी राजुरा उप विभागीय कृषी अधिकारी यांना निवेदनातून केले. एम. पी. पवार, उप विभागीय कृषी अधिकारी हे काही कामानिमित्याने कार्यालयात उपस्थित नसल्याने तालुका कृषी अधिकारी व्ही. मकपल्ले यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी महादेव तपासे, उपाध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी, सुरेश रागीट, कैलास कार्लेकर, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भाऊराव बोबडे, सरपंच, सातरी, संजय जयपूरकर, भाजपा नेते,
आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेत तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबत कळविणार असल्याचे सांगत असे गैरकृत्य जर कोणी कृषीकेंद्र संचालक करित असेल तर त्यांच्यावर योग्य ती कडक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांची मागणी आल्यास अनुदान तत्वावर मिर्ची बियाने तसेच अन्य बी बियाने उपलब्ध करून देता येईल का या संबंधित चर्चा वरिष्ठ अधिकारी यांच्याशी करणार असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी व्ही. मकपले यांनी यावेळी व्यक्त केले.
कृषी केंद्र संचालक यांनी त्यांना प्राप्त झालेले एकूण मिर्ची बियाने याचा साठा आणी मिर्ची बियाने यांचे अधिकृत दर हे कृषीकेंद्राच्या दर्शनी भागात लावावे. जेणेकरून त्याविषयींची माहिती सर्वसामान्य शेतकरी, संबंधित अधिकारी आणी कार्यालयास राहिल. परंतु प्रत्यक्षात असे दिसत नसल्याने व ज्यादा दराणे मिर्ची बियाने विक्री होतं असल्याने तात्काळ अश्या दोषीवर कार्यवाही करावी तसेच त्यांचे कृषी केंद्र विक्री परवाने जप्त करावे अन्यथा आंदोलन करून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू - भाऊराव चंदनखेडे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा किसान आघाडी



कोणत्याही टिप्पण्या नाहीत