Breaking News

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सावनेर तालुका अध्यक्ष यांचा दौरा

 जोगापूर वन पर्यटन एक उत्तम पर्याय - तुषार डाखरे 


महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, लोकेश पारखी, राजुरा :
चंद्रपूर जिल्हा हा वन संपदेने नटलेला, वन्यजीव आणि विशेष म्हणजे ताडोबा व्याग्र प्रकल्पाने ओळख असलेला मोठया प्रमाणात वेकोली च्या कोळसा खाणी, सिमेंट उदयोग व औद्योगिकदृष्टीने संपन्न असा हा जिल्हा. ताडोबा सफारी जरी करता आली नाही परंतु जोगापूर वन पर्यटनामुळे मात्र एक उत्तम पर्याय बघताना आनंद झाला असे प्रतिपादन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सावनेर तालुका अध्यक्ष तुषार डाखरे यांनी व्यक्त केले. राजुरा शहरालगतच जोगापूरचे घनदाट व सुंदर जंगल आहे. 

या जंगलात मोठ्या प्रमाणात वण्यप्राण्यांचे वास्तव्य सुद्धा आहे. राजुरा-आसिफाबाद या राज्यमार्गावर शहरापासून अवघ्या 2 किमी अंतरापासून जंगल सुरू होते. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रोई, निलगाल, राणटी कुत्री, सांबर, चितळ, मोर, जंगली डुकरे यासह विविध वण्यप्राणी वास्तव्यास आहे. त्यांच्या वास्तव्यामुळे व निसर्गरम्य वातावरणामुळे वन विभागाने या ठिकाणी वनपर्यटन क्षेत्र घोषित केले असून येथे जंगल सफारी सुद्धा सुरू केली आहे . मोठ्या प्रमाणात पर्यटकांना या जंगलातील वन्यप्राण्यांच्या दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येतो.या ठिकाणी असलेले वेगवेगळे पर्यटन ठिकाण हे लक्षवेधी असून अतिशय मनमोहक व निसर्गरम्य ठिकाण आहेत. 

मध्य चांदा वनविभाग राजुरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी  एस. डी. येलकेवाड, यांच्या नेतृत्वात वनविभागाचे चांगले कार्य सुरु असून  क्षेत्र सहाय्यक  पी. आर. मत्ते, संतोष संघमवार यांनी आपल्या सहकार्यासोबत समन्वय साधून वनपर्यटन व वन्यजीव, वणाची उत्तम प्रकारे सुरक्षा ठेवली आहे.त्यामुळे येथील सर्व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजेत असे मत तुषार डाखरे यांनी व्यक्त केले आहे. 

यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा या चमुचे अभिनंदन करीत त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनुकरनीय, आदर्श आणी वेगळेपणाचा ठसा उमटवीणारे आहे असेही डाखरे म्हणाले. यावेळी त्यांच्या पत्नी राणी डाखरे, मुलगी भार्गवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीचे विजय पचारे, राजुरा तालुका  महिला संघटिका सुवर्णा बेले, बाल संघटिका दुर्वा बेले, ओवी बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत