Breaking News

देवेंद्र फडणवीसांना शिक्षा होणार की निर्दोष सुटणार? ५ सप्टेंबरला सुनावणी, नेमकं प्रकरण काय?

 देवेंद्र फडणवीसांना शिक्षा होणार की निर्दोष सुटणार? ५ सप्टेंबरला  नेमकं प्रकरण काय?


माहा गदामोड़ी न्यूज़ प्रथिनिधि कमलेश खोब्रागड़े नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती दडवल्याचा दावा अ‍ॅड. सतीश उके यांनी केला आहे. याप्रकरणी मंगळवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत निर्णय राखून ठेवला. यावर ते ५ सप्टेंबरला निर्णय देणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवली, असा दावा करणारी याचिका अ‍ॅड. सतीश उके यांनी दाखल केली आहे.


या प्रकरणात फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे. यापूर्वी अ‍ॅड. उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वकील सुबोध धर्माधिकारी यांनी सांगितले की, नजर चुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत