वृक्ष रक्षाबंधन व नेत्रदान पंधरवाडा जनजागृती संपन्न.- राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट -गाईड व नेफडो चा संयुक्त उपक्रम.
पर्यावरणातील समतोल राखण्यात वृक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका. - सतीश धोटे
- वृक्ष रक्षाबंधन व नेत्रदान पंधरवाडा जनजागृती संपन्न.
- राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट -गाईड व नेफडो चा संयुक्त उपक्रम.
राजुरा:बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना विभाग, स्काऊट गाईड युनिट व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राजुरा येथील मध्य चांदा वनविभागाच्या वनोद्यानांमध्ये वृक्ष रक्षाबंधन व नेत्रदान पंधरवाडा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीश धोटे, अध्यक्ष, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून भास्करराव येसेकर, सचिव, बा. शी. प्र. मं., शंकर बुऱ्हान, माजी नेत्र चिकित्सा अधिकारी तथा राजुरा शहर उपाध्यक्ष नेफडो, पी. आर. मत्ते, क्षेत्र सहाय्यक, वनविभाग, एस. व्ही. मेश्राम, वनपाल, सामाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा, एस. व्ही. गजलवार, वनरक्षक, वनविभाग, नंदकिशोर पारधी, तालुका अध्यक्ष, बल्लारपूर, नेफडो, अल्का सदावर्ते, संचालिका,बा. शी. प्र. मं. तथा संघटिका नेफडो, दिलीप सदावर्ते, नागपूर विभाग उपाध्यक्ष,एम. ए. चापले, राजेंद्र दुर्गे, प्रदीप भावे, राजुरा तालुका उपाध्यक्ष, नेफडो, लांजेवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट लीडर यांनी केले. प्रास्ताविक रुपेश चिडे, स्काऊट लीडर यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बबलू चव्हाण, आशिष करमरकर, वर्षा कोयचाडे,स्वाती मेश्राम, भाग्यश्री क्षीरसागर, राष्ट्रीय हरित सेना विद्यार्थिनी प्रमुख मानसी बोबडे, विध्यार्थी प्रमुख यश कुळमेथे, राष्ट्रीय हरित सेना विभाग स्काऊट गाईड युनिट नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुराच्या वतीने अथक परिश्रम घेतले. सुरेश येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. राखी निर्मिती स्पर्धेतील प्रथम क्रमांक ध्रुव वाटेकर, द्वितीय संजना जुनघरे, तृतीय आर्यन वांढरे, प्रोत्साहनपर सुहाना पहानपटे यांना भेटवस्तु देण्यात आल्या. यावेळी उपस्थित सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करीत जनजागृती करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्ष प्रतिज्ञा घेऊन परिसरातील वृक्षांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या.
*कोट*
सतीश धोटे, अध्यक्ष, बा. शी. प्र. मं.
पर्यावरनातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी आपले कर्तव्य व जबाबदारींचे भान ठेवून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले पाहिजे. तसेच पर्यावरणातील समतोल राखण्यात वृक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका असून प्रत्येकांनी वृक्षाची काळजी घ्यावी असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश धोटे यांनी केले.
*कोट*
शंकर बुऱ्हान, माजी नेत्र चिकित्सा अधिकारी तथा उपाध्यक्ष, राजुरा शहर, नेफडो
जिवंतपणी रक्तदान, किडनीदान व अवयवदान व मृत्यू पश्चात फक्त नेत्रदान करू शकतो. नेत्रदान केल्याने अंध व्यक्तींना दृष्टी प्रदान करू शकतो. मरणोत्तर नेत्रदान करावे व दृष्टी हिनाच्या जीवनात प्रकाश निर्माण करून हे जग पुन्हा बघण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्यावी असे आवाहन शंकर बुऱ्हान यांनी केले. अ जीवनसत्व कमी, जंतू संसर्ग, अपघात, दृष्टीदोष, मोतीबिंदू, काचबिंदू व इतर कारणांनी आपल्याला डोळे गमवावे लागतात. परंतु नेत्रदान केल्यास आपल्याला पुन्हा जग बघण्याची संधी मिळू शकते त्यामुळे मोठयाप्रमाणात नेत्रदाण करण्याचे आवाहन करीत 38 व्या नेत्रदान पंधरवाड्याची जनजागृती करण्यासाठी संकल्प घेण्यात आला.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत