Breaking News

टेकामांडवा परिसरात अवैध धंद्यांना ऊत आल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता

 टेकामांडवा परिसरात अवैध धंद्यांना ऊत आल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता

वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतील का ? 

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : महाराष्ट्रच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला उत आलेला आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे जाणवू लागले आहे. टेकामांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूप मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून या अवैध धंदे करणाऱ्या सोबत संबंधित ठाण्याच्या ठाणेदाराचे मधुर संबंध असल्याची चर्चा सुरू असल्याची बाब समोर आली आहे. 

जिवती तालुका मागास असल्यामुळे या तालुक्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असणे गरजेचे असून सुद्धा कुठेतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे टेकामांडवा पोलीस स्टेशनचे ठाणेदाराचा आशीर्वादाने खुलेआम अवैध दारू अवैध जुगार अवैध प्रमाणे गांजा विक्री व इतरही अवैध धंदे जोमाने सुरू असून ठाणेदाराचे अवैध धंदेवाल्या सोबत मधुर संबंध असल्याने खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होत असल्याचे परिसरात चर्चेला उत आले आहे.

टेकामांडवा पोलीस ठाणे अंतर्गत परिसरातू तेलंगाना मार्गे मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याची चर्चा सुरू असून या सर्व अवैध धंदे करणाऱ्यावर पोलीस ठाणेदारांचे आशीर्वाद असल्यामुळे अवैध धंदे करणारे कोणालाही न जुमानता खुलेआम अवैध दारू अवैध जुगार अवैध गांजा अवैधरित्या वाळूची उपसा वाहतूक करत आहे. 

या अवैधरित्या धंदे करणाऱ्या मुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून संबंधित ठाण्याच्या अंतर्गत अवैध धंदे सुरू असून हे धंदे लवकरात लवकर बंद व्हावे व संबंधित ठाणेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत