ब्रम्हपुरी शहराची अस्मिता घालवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करा
ब्रम्हपुरी शहराची अस्मिता घालवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करा
आम आदमी पक्षाची जिल्हाधिकारी यांना तक्रार
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, ब्रम्हपुरी : आपल्या शहरात सांडपाण्याची व्यवस्था करणे, जन्ममृत्युची नोंद ठेवणे, आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषद प्रशासकाचे आवश्यक कामे आहेत.प्रशासक (मुख्याधिकारी) यांची निवड महाराष्ट्र नागरी सेवा (राज्यसेवा) परिक्षेतून केली जाते.उच्च शिक्षित व पदस्त व्यक्तीकडून शहर न्यायाची अपेक्षा करीत असतो मात्र आम आदमी पक्षा तर्फे जिल्हा उपाध्यक्ष श्री नवेद खान यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना ब्रम्हपुरी नगरपरिषद मध्ये कार्यरत प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती अर्शीया जुही यांच्याकडून होणाऱ्या गैरवर्तवणुक व नागरिकांची दिशाभूल करण्याचे आरोप करीत,त्यांच्यावर सखोल चौकशी करीत कारवाई करण्यात यावी करिता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन दिले आहे.
नगरपरिषद कार्यालयात दाखल माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मागितलेल्या माहितीचे उत्तर देणे टाळत, जन माहिती अधिकारी श्री बोन्द्रे यांनी अपुरी माहिती दिली व "अपील करा त्यात बघू" असे उत्तर देतं हेतूपूरस्पर अर्जदाराची वेळ वाया घालवीण्याचे कामं केले व दाखल केलेल्या अपील ला मुख्याधिकारी अर्शीया जुही यांनी सुनवाई दरम्यान अर्जदाराला अतिशय उर्मट वागणूक देतं "आम्ही काही करू शकत नाही, पुढे अपील करा आम्ही पाहून घेऊ" असे उत्तर देतं "आमचे समाधान झाले" असा लेखी मजकूर तयार करीत स्वाक्षरी करण्यासाठी दबाव देण्याचा प्रयत्न केला. स्वाक्षरी करण्यास असमर्थता दर्शविली असता. अपील फेटाळण्यात येत आहे असा आदेश पारित केला.
शांत , संयमी व सुसंस्कृत शहर म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात ख्याती असलेला ब्रम्हपुरी शहर आजघडीला नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे गैरवर्तवणुकीने हतबल झालेला आहे. शहराची अस्मिता अबाधित राखण्याकरिता, ब्रम्हपुरी नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेवर सखोल चौकशी करून उचित योग्य कारवाई व्हावी व ब्रम्हपुरी शहराची प्रतिमा उंचवावी अन्यथा माहिती न देता जनतेची दिशाभूल करणाऱ्याचा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांचे विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत