कै.नीलकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात शिवजयंती साजरी
कै.नीलकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात शिवजयंती साजरी
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, वरोरा : स्थानिक कै.नीलकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजींचा जन्मदिवस हा 'शिवजयंती' म्हणून साजरा होतो. कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य अजय रामटेके सर तर प्रमुख वक्ता म्हणून आनंद सागर महाविद्यालयाच्या प्राचार्या कु. स्नेहा गिरडे मॅडम उपस्थित होत्या .
याप्रसंगी प्रमुख वक्त्या स्नेहा गिरडे मॅडम यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या नियोजनाचे तसेच त्यांच्या लोककल्याणकारी भूमिकेविषयी मार्गदर्शन केले .तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय अजय रामटेके सर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन परिचयावर प्रकाश टाकला . या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका कु. सीमा बोभाटे मॅडम तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका कु. प्रणाली नरड मॅडम यांनी केले .या कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे प्राध्यापक पीयूष लांडगे सर, प्रमोद पाठक सर शिक्षकेतर कर्मचारी इंदिरा निखाडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत