चंद्रपूर शहरातील खोदलेल्या खड्डे व धुळी विरोधात मनसेचे मास्क वाटप करीत तीव्र निदर्शने
मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन..
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी. शेख हक्कानी, चंद्रपूर : महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या गैरसोयीचा विचार न करता शहरातील दोन्ही मुख्य रस्त्यांवर खोदकाम व खड्डे खोदले आहे . खोदकामाने मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे . यामुळे जनता हैराण झाली असून धुळीने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे . जनतेच्या गैर सोयची दखल घेत महानगरपालिका प्रशासना विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात दि. 11 फेब्रुवारी रोजी जटपुरा गेट समोर तीव्र निदर्शने करण्यात आले व मास्क वाटप करून मनपाचा निषेध करण्यात आला.
चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने प्रशासकाच्या ताब्यात आहे. यामुळे आयुक्तांचा मनमानी कारभार सुरू आहे. शहरात दोन मुख्य रस्ते असताना या दोन्ही रस्त्यावर अमृत योजनेची पाईप लाईन खोदकाम, खड्डे मुळे शहरात मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे . यामुळे वाहतूक जाम होत आहे . एक ते दोन तास एक जागेवर ताटकळत रहावे लागते.मनपाच्या यांनी मनमानी विरोधात मनसे अध्यक्ष मनदिप रोडे यांनी आज शेकडो कार्यकर्तासह जटपुरा गेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.यावेळी जनतेला मास्क वाटप करून मनपाचा निषेध करण्यात आला. यावेळी मनपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांनी मनपावर प्रशासन विरोधात तीव्र टीका केली. मनपाने नागरिकांना रस्ते खोदताना पूर्व कल्पना देण्याची आवश्यकता होती. रस्त्याने जाताना जनतेला कुठलाही त्रास न देता काम करण्याची गरज होती. अमृतच्या कामात मोठ्या भ्रष्टाचार झाला आहे . ठेकेदार व मनपा अधिकारी आपली मनमानी करीत असल्याने जनतेच्या गैरसोयाची पर्वा नाही. आज शहरात मुख्य रस्त्यांवर खड्डे खोदले असल्याने सर्वत्र धूळ उडत आहे. धुळीने नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे.
येत्या काळात मनपाने खोदलेल्या खड्डे दुरुस्त दुरुस्ती करावी व धुळीपासून शहराला मदत करावे .अन्यथा येत्या काळात मनपाविरोधात नागरिकाचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांनी मनपाला दिले आहे . यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, तालुका अध्यक्ष आदित्य भाके, तालुका अध्यक्ष महिला सेना शालू ताई वांढरे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजू बघेल, शहर अध्यक्ष महिला सेना सुनीता ताई तोड्साम, शहर अध्यक्ष वाहतूक सेना अस्लम खान, तालुका अध्यक्ष गोपाल मोहुर्ले, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, शहर सचिव सुमित करपे,शहर संघटक राहुल मडावी , शहर उपाध्यक्ष बाळा चंदनवार, प्रसिद्धी प्रमुख नितेश जांभूळकर तालुका अध्यक्ष पंकज राजपूत, शहर अध्यक्ष सुमित कोहडे, जिल्हा चिटणीस कामगार सेना अजय रेव्वेलीवार,शहर चिटणीस कामगार सेना राम सारवा, विभाग अध्यक्ष राकेश हनुमंते, तालुका संघटक अमोल मेश्राम, राजू शेट्टी, नितीन बावणे , संदीप आरडे, रोशन बतकी,मिथुन महाकुलकर , वसीम शेख, प्रविण उके, ज्योतिष सोनेकर , रितिक मांडवकर,संजय सोनकर , प्रशांत खामत, अक्षय नागराळे, आशीष डाकरे, गुड्डू पठान , बंडु पेंदाम, अमोल साव , सुरेंद्र साव, महेश कुचनकर, अनूप गौरकार, सूरज सरदम, आंदोलनात मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत