Breaking News

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली (वन) येथे नवागत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली (वन) येथे नवागत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी | शेख हक्कानी | चंद्रपूर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनुर्ली (वन) येथे दिनांक २३ जून २०२५ रोजी नवागत शाळा प्रवेशोत्सव व सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नवागत विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलबंडीतील मिरवणूक, तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत, गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण, आणि मिष्टान्न भोजनाची व्यवस्था यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे  योगेश मोहितकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख  विलास देवाळकर उपस्थित होते. याशिवाय मुख्याध्यापक बाळा बोढे, शिक्षिका  प्रभावती हिरादेवे,  मेनका मुंडे, आणि शिक्षक विजय राऊत,  सुनिल अलोने यांचीही उपस्थिती लाभली.

 कार्यक्रमाची सुरुवात नवागत विद्यार्थ्यांच्या गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात झालेल्या मिरवणुकीने झाली. शाळेच्या प्रवेशद्वारावर फुलांची सजावट करण्यात आली होती. नवागत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळेत आत्मीयतेने स्वागत करण्यात आले.

प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेच्या वतीने गणवेश आणि नवीन पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी चविष्ट मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील पालक व ग्रामस्थांचा सहभाग व उत्साह विशेषत्वाने जाणवला. गाव व शाळा यांच्यातील स्नेहबंध अधिक बळकट होण्यास हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, असे मत पाहुण्यांनी यावेळी व्यक्त केले.


1 टिप्पणी: