Breaking News

सुसज्ज अंगणवाडी नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

 सुसज्ज अंगणवाडी नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सूखसागर झाडे, चामोर्शी : ग्रामपंचायत वेलतूर तुकूम अंतर्गत वेलतूर तुकूम येथे नवीन अंगणवाडी बांधकाम इमारतीचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रम चे उदघाटक सौं. संध्या नायबनकर सरपंच ग्रा. पं. वेलतूर तुकूम, दिगांबर धानोरकर उपसरपंच, संजय चौधरी सदस्य, शालू कुळसंगे, सुनीता पाल सदस्या, एस. बी. जांभुळकर ग्रामसेवक, सातपुते सर मुख्याध्यापक वेलतूर तुकूम, सुभाष उंदीरवाडे सहाय्यक शिक्षक, सौं, मालता कुळसंगे अंगणवाडी सेविका, रामदास कोहपरे माजी सरपंच, मुनीराज झरकर, अशोक कुळसंगे, गंगाधर शेडमाके, हंसराज झरकर ग्रा. कर्मचारी, शेषराव धोटे पा. पु. शिपाई, राजेश्वर धोटे, सुधाकर नानगिरवार, विकास कुळसंगे, अनिल कुळसंगे, सीताबाई जगझाके, वासुदेव धोटे. व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत आज दि. 11/07/2025 रोज शुक्रवारला लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर सुसज्य इमारतीचे बांधकाम मानव विकास मिशन व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेतून करण्यात आले.

 या अगोदर वेलतूर तुकूम येथे अंगणवाडी ची इमारत नव्हती. जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारती मध्ये अंगणवाडी भरविली जात होती. त्यामुळे पावसाळ्यात सदर इमारत गळतीचा सामना करावा लागत होता. ग्रामीण भागात अंगणवाडी हि ०ते ३ व ३ते ६ वयोगट बालकांचे शैक्षणिक संस्कारघर असून या मधुन विविध पाढे गिरवीत विद्यार्थी दिशेच्या वाटचालीस सुरवात होते. त्यातच स्वच्छ सुंदर , बोलक्या चित्रभिंती यामधुनही बालकाचे मन E-mail जात असते गाववासीयांची अनेक वर्षांपासून असलेले स्वप्नपूर्ती आज पुर्णत्वास झाल्याने आज प्रत्येकांचे मन आनंदाने भरून आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत