Breaking News

घरावरून गेलेल्या विद्युत तारांची उपाययोजना करून वारंवार खंडीत होणारी विजपुरवठा सुरळीत सुरू - मनसेचे कृष्णा गुप्ता यांच्या मागणीला यश

 घरावरून गेलेल्या विद्युत तारांची उपाययोजना करून वारंवार खंडीत होणारी विजपुरवठा सुरळीत सुरू - मनसेचे कृष्णा गुप्ता यांच्या मागणीला यश

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर :- महाकाली कालरी परिसरातील प्रकाश नगर येथील विजपुरवठा वांरवार खंडीत होत असून सामान्य माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तसेच या परीसरातील विजेचे तार कमकुवत झाले असून, अगदी खाली आले आहेत यामुळे या तारांना स्पर्श होऊन जीवीतहानी सूद्धा होण्याची दाट शक्यता आहे त्यामूळे जनजीवन भयभीत झाले असून वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे शालेय विद्यार्थी छोटे व्यवसाहिक यांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

 तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून सदर परीसरातील वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना संबधीत विभागाला देऊन येथील नागरीकाना दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन दिनांक १६/०४/२०२५ ला मनसेचे रुग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार तथा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष श्री. कुलदिप चंदनखेडे यांच्या कडून देण्यात आले होते. आज सदर कामाला सुरवात झाली असून मनसेच्या मागणीला यश आल्याने परीसरातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

मनसेचे रुग्णमित्र हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असून वेळोवेळी समाजहिताचे कार्य करीत असतात या कार्याने त्यांचे परीसरातील नागरीकांकडून कौतूक केले जात आहे.. निवेदन देणार्या शिष्टमंडळात जिल्हा सचिव श्री किशोर मडगुलवार जिल्हा उपाध्यक्ष मनविसे कुलदिप चंदनखेडे मनविसे ता, उपाध्यक्ष प्रविन शेवते राजु भाऊ देवांगन शंकर भड़के आणि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत