Breaking News

विद्यार्थीप्रश्न घेऊन विद्यार्थ्यांची मंत्रालयात धाव....

विद्यार्थीप्रश्न घेऊन विद्यार्थ्यांची मंत्रालयात धाव....

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सुनील शेळके, पूर्णा : दिनांक आठ जुलै 2025 रोजी शिव ,फुले,शाहू ,आंबेडकर विद्यार्थी समितीच्या वतीने मंत्रालय मुंबई येथे राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विविध भेटी घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले त्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेला शैक्षणिक वर्ष 24 25 मधील अर्जाला तुरटी करण्याची मुदत वाढ 31 जुलै पर्यंत देण्यात यावी या मागणीचे निवेदन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या सचिव कार्यालयामध्ये देण्यात आले.. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती (MAHADBT) शिष्यवृत्तीच्या प्रश्नांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालयीन प्रधान सचिव यांच्याकडे देण्यात आले... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था भारती मुख्य संचालक सुनील जी वारे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अभी छात्रावृत्ती(BANRF)2023 ची जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करण्यात यावी या मागणीला घेऊन चर्चा करण्यात आली.. यावेळी विद्यार्थी समन्वयक प्रबुद्ध शामसुंदर काळे,अक्षय कुमार गायकवाड, गजानन नरवाडे, प्रभाकर राके, मनीष सावळे, मुंजाजी उर्फ सोनू खंदारे यांच्या निवेदनावरती स्वाक्षरी आहेत..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत