Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती विद्यालयाचे सुयश

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, संतोष रोकडे, अर्जुनी/मोर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 9 फेब्रुवारी 2025 ला घेण्यात आली होती यामध्ये सरस्वती विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इयत्ता 5 वीचे आर्यन अनिल पडोळे,नैतिक संजय शिवणकर, साची पार्थराव बडवाईक, श्रेया श्रीकांत बोरकर,सृष्टी सुरेश तरोणे,सम्यक मनोजकुमार डोंगरवार असे एकूण सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. 

तर पूर्व माध्यमिक इयत्ता आठवीचे धनुष नरेशकुमार आकरे (जिल्ह्यातून प्रथम),ईशांत राजेश संग्रामे, शौर्य संजय मस्के ,उन्नती दिगंबर कुंभलवार,विवेक किशोरकुमार मस्के, यथार्थ अमितकुमार सरजारे, निधीश संजय चाचिरे असे एकूण सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेच्या वतीने शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण,उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत