Breaking News

हिंगणा येथे लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नागपूर : दिनांक 1.8.2025 रोजी महान साहित्यिक व लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती असल्याने हिंगणा येथे श्री अण्णाभाऊ साठे स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व समाज भवन येथे जयंती करिता अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष श्री केशव भाऊ डोंगरे व संविधान शेंडे, मेश्राम जी, संजय गायकवाड, प्रिया बावणे, दुर्गा गायकवाड अशा महिला इत्यादी तसेच केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाशजी लारोकर, विशाल बांदरे संघटक , सहसचिव देवेंद्रजी डोंगरे, प्रसिद्धीप्रमुख श्री रमेश कनेरे, ज्येष्ठ सदस्य श्री प्रशांत जोशी असे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांनी आपापल्या भाषणामध्ये श्री अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.

 अध्यक्षीय भाषणातून श्री प्रकाश लारोकर यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हटले की, त्यात निरक्षर श्री अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळेत गेले असताना त्यांना हीन वागणूक देण्यात आली होती तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता मनात जिद्ध बाळगून त्यांनी 49 वर्ष साहित्य लेखनातून एक आपल्या भारतात ठसा उमटून अलौकिक मिळवला तरी या त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन करण्यात आले, "समाजात जगण्यासाठी ज्यांनी दिले अभिमानाचे स्थान ,साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्मान"असे विचार मांडण्यात आले.

अशा अभिवादन प्रसंगी व लहान मुले मुली यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन त्यांना मार्गदर्शन करून. व्यसनमुक्ती व्हावी म्हणून सगळ्यांनी आपापल्या भाषणातून सदर बाबीवर योग्य प्रकाश टाकला त्यात विशेष करून महिलांना प्राधान्य देण्यात आले त्यानंतर सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रवी बावणे यांनी केले.

बातमी संकलन : विशाल बांदरे, हिंगणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत